भारतीय राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघातील वरिष्ठ फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 

ठळक मुद्दे:

  • अजिंक्यने आपल्या १२ वर्षांच्या (२०११-२०२३) शानदार कारकिर्दीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
  • २०१५ च्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. 
  • त्याच्या या कारकिर्दीत कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० अशा सर्व प्रकारात मिळून एकूण १९५ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता.
  • तो भारताच्या मधल्या फळीतील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक बनला होता.
  • त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ६ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषविले.
  • २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या ऐतिहासिक अशा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मध्ये भारताला विजय मिळवून दिला.  

अजिंक्य रहाणेची उल्लेखनीय क्रिकेट कारकीर्द:

  • ९० एकदिवसीय सामन्यांमध्ये ३ शतके आणि २४ अर्धशतकांसह २,९६२ धावा केल्या. 
  • कसोटी क्रिकेटमध्ये ८५ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ३८.४६ च्या सरासरीने ५,०७७ धावा केल्या, ज्यात १२ शतके आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे.
  • २०११ मध्ये इंग्लंड विरुद्ध ट्वेंटी-२० प्रकारात पदार्पण करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३७५ धावा बनवल्या.