नुकतीच एअर मार्शल इंद्रपाल सिंग वालिया यांची भारतीय वायुसेनेचे (Indian Air Force - IAF) पुढील 'व्हाइस चीफ (Vice Chief)' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • ते ईस्टर्न एअर कमांडचे 'एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (Air Officer Commanding-in-Chief)' म्हणून कार्यरत होते.
  • भारतीय वायुसेनेचे २९ वे 'चीफ ऑफ द एअर स्टाफ' (CAS) म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची जागा घेतील.
  • वालिया 'एअर चीफ मार्शल' या पदावर ३१ ऑक्टोबर २०२६ पासून कार्यभार स्वीकारतील.

IAF बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full-Form): IAF म्हणजेच Indian Air Force अर्थात भारतीय हवाई दल होय.
  • स्थापना वर्ष: ८ ऑक्टोबर १९३२ रोजी IAF ची स्थापना करण्यात आली होती.
  • बोधवाक्य (Motto): 'नभः स्पृशं दीप्तम्' (Touch the Sky with Glory) हे भारतीय हवाई दलाचे बोधवाक्य आहे.
  • मुख्यालयाचे ठिकाण: IAF मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे.
  • सर्वोच्च कमांडर: भारताचे राष्ट्रपती हे भारतीय हवाई दलाचे सर्वोच्च कमांडर असतात.
  • सध्याचे वायुसेना प्रमुख: एअर मार्शल (Air Marshal) आशुतोष दीक्षित हे सध्याचे वायुसेना प्रमुख आहेत.
  • वायुसेना दिन साजरा: ८ ऑक्टोबर रोजी वायुसेना दिन साजरा करण्यात येतो.