नुकतीच एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय हवाई दलाचे ( Indian Air Force - IAF) २९ वे प्रमुख (Chief of the Air Staff - CAS) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • सदर नियुक्ती ही ३१ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होईल आणि त्यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२८ पर्यंत असेल.
  • ते ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी निवृत्त होणाऱ्या एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांची जागा घेतील.

एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • सदर नियुक्तीपूर्वी एअर मार्शल दीक्षित 'हवाई दल उपप्रमुख (Vice Chief of the Air Staff)' म्हणून कार्यरत होते.

याआधी भूषविलेली पदे:

  • 'हेडक्वार्टर्स इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ' येथे 'चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी'च्या अध्यक्षांचे 'चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ'
  • 'सेंट्रल एअर कमांड'चे 'एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ' (AOC-in-C)

IAF बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full-Form): IAF म्हणजेच Indian Air Force अर्थात भारतीय हवाई दल होय.
  • स्थापना वर्ष: ८ ऑक्टोबर १९३२ रोजी IAF ची स्थापना करण्यात आली होती.
  • बोधवाक्य (Motto): 'नभः स्पृशं दीप्तम्' (Touch the Sky with Glory) हे भारतीय हवाई दलाचे बोधवाक्य आहे.
  • मुख्यालयाचे ठिकाण: IAF मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे.
  • सर्वोच्च कमांडर: भारताचे राष्ट्रपती हे भारतीय हवाई दलाचे सर्वोच्च कमांडर असतात.
  • सध्याचे वायुसेना प्रमुख: एअर मार्शल (Air Marshal) आशुतोष दीक्षित हे सध्याचे वायुसेना प्रमुख आहेत.
  • वायुसेना दिन साजरा: ८ ऑक्टोबर रोजी वायुसेना दिन साजरा करण्यात येतो.