२०२९ मध्ये भारतातील अहमदाबाद येथे प्रथमच 'सीनिअर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप (Senior World Weightlifting Championships)'चे आयोजन करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे:
- 'आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनमार्फत (International Weightlifting Federation)' २०२९ च्या 'सीनिअर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप (Senior World Weightlifting Championships)'चे यजमानपद गुजरातच्या अहमदाबाद शहराला देण्यात आले आहे.
- चीनमधील निंगबो येथे झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
- भारताला सदर स्पर्धेचे आयोजन करण्याची मिळालेली ही पहिलीच आणि तितकीच ऐतिहासिक महत्वाची वेळ आहे.