ऑक्टोबर २०२६ मध्ये अहमदाबादमध्ये 'कॉमनवेल्थ क्यू स्पोर्ट्स चॅम्पियनशिपचे (Commonwealth Cue Sports Championships)' आयोजन करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे:
- 'वर्ल्ड पूल असोसिएशन'चे (World Pool Association - WPA) अध्यक्ष इशान सिंग यांनी नुकतेच जाहीर केले की ऑक्टोबर २०२६ मध्ये गुजरात मधील अहमदाबाद येथील 'वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स'मध्ये 'कॉमनवेल्थ क्यू स्पोर्ट्स चॅम्पियनशिप' आयोजित करण्यात येणार आहे.
- सदर स्पर्धेची ही दुसरी आवृत्ती होती.
- यंदाच्या या स्पर्धेत ४५ देशांतील खेळाडू सहभागी होतील.
- यामध्ये पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत ५ प्रकारांमध्ये आणि १० पदक-स्पर्धांमध्ये सामने खेळले जातील.
- सदर स्पर्धा ही 'बिलियर्ड्स अँड स्नूकर फेडरेशन ऑफ इंडिया' (Billiards and Snooker Federation of India - BSFI) आणि 'वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ बिलियर्ड्स स्पोर्ट्स' (World Confederation of Billiards Sports - WCBS) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे.