अग्निकवच सेफ्टीमार्फत (Agnikawach Safety) औद्योगिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी ‘अग्नी कवच (Agni Kawach)’ या भारताच्या पहिल्या स्वदेशी एआय प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • अग्निकवच सेफ्टी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडने (Agnikawach Safety Solutions Private Limited) ‘अग्नी कवच’ या पहिल्या स्वदेशी एआय प्लॅटफॉर्मचे सादरीकरण केले.
  • जागतिक औद्योगिक सुरक्षा परिसंस्था तयार करणे या मुख्य उद्देशाने भारताचे पहिले स्वदेशी बनावटीचे कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) आधारित सुरक्षा प्लॅटफॉर्म ‘अग्नी कवच’चे अनावरण करण्यात आले.

अग्नी कवच प्लॅटफॉर्मबद्दल थोडक्यात माहिती:

  • जलद जोखीम विश्लेषणासाठी हे प्लॅटफॉर्म कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट (GPU) तसेच इतर बऱ्याच वैशिष्ट्यपूर्ण बाबींना एकाच सुरक्षा प्लॅटफॉर्मवर एकत्रित करते.
  • सदर प्लॅटफॉर्म हे प्रमुख औद्योगिक धोक्यांपासून सुरक्षा प्रदान करण्याचे कार्य सुनिश्चित करते.
  • सध्याच्या स्थितीत या प्रोटोटाइपने आधीच टेक्नॉलॉजी रेडीनेस लेव्हल (TRL-5) गाठली आहे.
  • धोकादायक उद्योगांमध्ये याचा प्रमुख उपयोग करण्यात येऊ शकतो.

अग्निकावच सेफ्टी सोल्युशन्स प्रा. लि. बद्दल महत्वाची माहिती:

  • स्थापना वर्ष: जून २०२६ मध्ये या कंपनीची स्थान करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे कंपनीचे मुख्यालय स्थित आहे.