अडोबमार्फत अनिल चक्रवर्ती यांची अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (President and Chief Executive Officer) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • १ डिसेंबर २०२६ पासून सदर नियुक्ती प्रभावी होईल आणि ते कंपनीच्या संचालक मंडळातही सामील होतील.
  • दीर्घकाळ कार्यरत असणारे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांची ते जागा घेतील, जे आता कार्यकारी अध्यक्ष (Executive Chair) म्हणून पदभार स्वीकारतील.

अनिल चक्रवर्ती यांच्याबद्दल थोडक्यात माहिती:

  • त्यांनी इन्फॉर्मेटिकाचे CEO म्हणून तसेच सिमेंटेक, व्हेरीसाइन व मॅकिन्से अँड कंपनीमध्ये नेतृत्व पदांवर काम केले आहे.
  • जानेवारी २०२० मध्ये अडोबमध्ये सामील झाल्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये त्यांची 'डिजिटल अनुभव आणि जागतिक क्षेत्रीय कामकाजच्या (Digital Experience and Worldwide Field Operations)' अध्यक्षपदी पदोन्नती झाली होती.
  • त्यांनी एंटरप्राइझ सोल्यूशन्सच्या विस्ताराचे नेतृत्व करतानाच वर्कफ्रंट व सेमरशच्या अधिग्रहणांवर देखरेख केली होती.

अडोब Inc. बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • स्थापना वर्ष: १९८२ मध्ये जॉन वॉर्नॉक आणि चार्ल्स गेश्के यांनी अडोब Inc. ची स्थापना केली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे अडोब Inc. चे मुख्यालय स्थित आहे.