नुकतीच 'अदानी डिफेन्समार्फत (Adani Defence)' राजस्थानमध्ये ‘बघीरा एटी१ (Bagheera AT1)’ रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • 'अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस (Adani Defence & Aerospace)' ही अदानी समूहाची संरक्षण आणि एरोस्पेस शाखा आहे.
  • तिच्यामार्फत राजस्थान येथील पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये आपल्या ‘बघीरा एटी१’ या वाहनावर बसवलेल्या रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र (ATGM) प्रणालीचे थेट गोळीबाराचे प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पार पाडण्यात आले आहे.