नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'प्रवेश समानता निर्देशांक (Access Equality Index)' २०२६ मध्ये गोवा राज्य अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे.

ठळक मुद्दे:

  • या क्रमवारीत आंध्र प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर असून सामाजिक-आर्थिक सुरक्षेमध्ये आघाडीवर विराजमान झाले आहे.
  • ओ.पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी, हरियाणा येथील 'सेंटर फॉर न्यू इकॉनॉमिक्स स्टडीज (Centre for New Economics Studies - CNES)' मार्फत हा 'ॲक्सेस इक्वॅलिटी इंडेक्स (Access Equality Index)' २०२६ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
  • सदर निर्देशांकात भारतातील २८ राज्यांमधील आवश्यक सार्वजनिक सेवांच्या उपलब्धतेचे मूल्यमापन करण्यात आले आहे.

राज्यांची क्रमवारी:

  • १. गोवा (०.६८ गुण)
  • २. आंध्र प्रदेश (०.६६ गुण) 
  • ३. सिक्कीम (०.६३ गुण)

'सामाजिक-आर्थिक सुरक्षा (Socio-Economic Security)' क्रमवारी:

  • १. आंध्र प्रदेश (०.६९ गुण)
  • २. गोवा (०.५० गुण)