नुकतेच 'असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (Associated Chambers of Commerce and Industry of India - ASSOCHAM)' मार्फत जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार २०२६-३० या कालावधीसाठी जगातील १० प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक लवचिक अर्थव्यवस्था म्हणून भारत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे:
- ASSOCHAM मार्फत नुकताच 'सर्वात मोठ्या दहा अर्थव्यवस्थांमध्ये भारताची आर्थिक आघाडी (India’s Economic Edge in the Top Ten Economies)' नावाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
- सदर अहवालानुसार २०२६-३० या कालावधीत आर्थिक लवचिकतेच्या बाबतीत जगातील १० प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
- यामध्ये भारताला १०० पैकी ७१ गुण प्राप्त झाले आहेत.
अव्वल देश क्रमवारी:
- १. भारत
- २. चीन
- ३. जपान आणि रशिया