भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत (Archaeological Survey of India - ASI) नुकतेच तेलंगणातील 'गोल्लाल गुडी' मंदिराला 'राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक' म्हणून घोषित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत असणाऱ्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने (Archaeological Survey of India  - ASI) तेलंगणातील 'गोल्लाल गुडी'ला 'राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक' म्हणून घोषित केले आहे.
  • हे मंदिर तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यातील पालमपेट गावात स्थित आहे.
  • 'प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे व अवशेष कायदा, १९५८' अधिसूचनेद्वारे करण्यात आलेल्या सदर घोषणेमुळे तेलंगणातील ASI च्या अखत्यारीतील स्थळांची संख्या १० इतकी झाली आहे.

मंदिर वास्तुकलेबाबत थोडक्यात माहिती:

  • मंदिर स्थान: पालमपेट येथील युनेस्को UNESCO जागतिक वारसा स्थळ असलेल्या 'काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिरा'च्या नैऋत्य दिशेला हे मंदिर स्थित आहे.
  • स्थापत्य रचना : 'त्रिकुटालय' प्रकारातील हे मंदिर असून यात ३ गर्भगृहांची रचना आहे.
  • वैशिष्ट्य: पूर्वेकडे तोंड असलेला मंडप तसेच मध्यवर्ती गर्भगृहात असणारे शिविलिंग ही याची खास वैशिष्ट्ये आहेत.