आंध्र प्रदेशमार्फत नुकतीच अमरावतीमध्ये भारतातील पहिल्या समर्पित 'क्वांटम आणि एआय [Quantum and Artificial Intelligence (AI)]' विद्यापीठ परिसरास मंजुरी देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी अमरावती येथे भारतातील पहिल्या समर्पित 'क्वांटम आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स' विद्यापीठ परिसराच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे.

NIELIT क्वांटम आणि AI विद्यापीठ परिसराविषयी थोडक्यात माहिती:

  • 'राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेमार्फत (National Institute of Electronics and Information Technology - NIELIT)' या परिसराचा विकास करण्यात येणार आहे.
  • सदर संस्था ही 'इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालया'च्या (Ministry of Electronics and Information Technology - MeitY) अंतर्गत येणारी एक स्वायत्त वैज्ञानिक संस्था आहे.
  • जवळपास ८.५ एकर जागेवर विकसित करण्यात येणाऱ्या या परिसरावर ५ वर्षांच्या कालावधीत ७३०.७० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
  • पदवी, पदव्युत्तर, पीएचडी, पदविका आणि कार्यकारी कार्यक्रम इ. अभ्यासक्रम आणि विषय या विद्यापीठात उपलब्ध असतील.
  • क्वांटम कम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI), व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन (Very Large Scale Integration - VLSI) आणि सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन यांसारख्या प्रमुख क्षेत्रांवर यामध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.