चीनमधील मोकी येथे पार पडलेल्या 'आशियाई हॉकी फेडरेशन ज्युनियर आशिया कप (Asian Hockey Federation Junior Asia Cup)' २०२६ मध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघांनी दुहेरी विजेतेपदावर मोहोर उमटवली आहे.

ठळक मुद्दे:

  • ४ ते १३ सप्टेंबर २०२६ दरम्यान चीनमधील मोकी येथे 'आशियाई हॉकी फेडरेशन ज्युनियर आशिया कप' स्पर्धा पार पडली आहे. 
  • यात भारताच्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही 'अंडर-२०' संघांनी विजेतेपद पटकावले आहे.
  • दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव करून भारतीय पुरुष संघाने आपले विक्रमी ६ वे विजेतेपद पटकावले तर महिला संघाने यजमान चीनवर १-० अशी मात करत विजेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे.

AHF ज्युनियर आशिया कप २०२६ बाबत थोडक्यात माहिती:

  • सदर स्पर्धा ही 'आशियाई हॉकी फेडरेशन'द्वारे आयोजित चीनमधील मोकी येथे झालेली एक प्रमुख खंडस्तरीय 'अंडर-२०' स्वरूपाची हॉकी स्पर्धा होती. 
  • 'FIH ज्युनियर विश्वचषक' स्पर्धेसाठी पात्रता फेरी म्हणूनही ही स्पर्धा महत्वाची भूमिका बजावते.
  • अनमोल एक्का पुरुष गटातील स्पर्धेत सर्वाधिक गोल (१७ गोल) करणारा खेळाडू ठरला.
  • सानिका चंद्रकांत मानेने स्पर्धेत एकूण ७ गोल नोंदवत महिलांच्या अंतिम सामन्यात निर्णायक गोल केले.