मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत (Appointments Committee of the Cabinet - ACC) सुभास चंद्र लाल दास यांची 'फायनान्शिअल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन्स ब्युरो (Financial Services Institutions Bureau - FSIB)' चे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून ३ वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- दास हे १९९२ च्या बॅचचे निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत.
- ते अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश केडरचे आहेत.
- नवीन अध्यक्षांसोबतच वित्त मंत्रालयामार्फत FSIB मध्ये ६ अर्धवेळ सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.