नुकतीच मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत (ACC) देवेश चतुर्वेदी यांची 'नॅशनल स्पोर्ट्स बोर्ड'चे (National Sports Board - NSB) अध्यक्ष पदावर तर पी. के. गर्ग यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत (Appointments Committee of the Cabinet) निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा (Indian Administrative Service - IAS) अधिकारी श्री. देवेश चतुर्वेदी यांची 'नॅशनल स्पोर्ट्स बोर्ड (NSB)'च्या अध्यक्षपदी ३ वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे..
- ऑगस्ट २०२४ ते फेब्रुवारी २०२६ या काळात त्यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या 'कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग' येथे सचिव म्हणून काम केले होते.
- सदर नियुक्त्या मंत्रिमंडळ सचिव टी. व्ही. सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखालील 'शोध-सह-निवड समिती'च्या (Search-cum-Selection Committee) शिफारशींवर आधारित होत्या.