नुकताच ए. एस. राजीव यांनी प्रभारी केंद्रीय दक्षता आयुक्त (Acting Central Vigilance Commissioner) म्हणून पदभार स्वीकारला आहे.
ठळक मुद्दे:
- सध्या केंद्रीय दक्षता आयोगामध्ये (Central Vigilance Commission - CVC) दक्षता आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या ए. एस. राजीव नुकताच प्रभारी केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे.
- त्यांनी आसाम-मेघालय केडरचे १९८८ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी असणाऱ्या प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची जागा घेतली.
ए. एस. राजीव यांच्याबद्दल थोडक्यात महत्वपूर्ण माहिती:
- राजीव यांना सिंडिकेट बँक, विजया बँक, इंडियन बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र येथे बँकिंग कामकाज आणि प्रशासन या क्षेत्रांमध्ये ३८ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे
- केंद्रीय दक्षता आयोगामध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.
CVC बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): CVC म्हणजेच Central Vigilance Commission अर्थात केंद्रीय दक्षता आयोग होय.
- स्थापना वर्ष: ११ फेब्रुवारी १९६४ रोजी CVC ची स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे CVC चे मुख्यालय स्थित आहे.
- वैधानिक दर्जा प्राप्त वर्ष: केंद्रीय दक्षता आयोग कायदा, २००३ अंतर्गत २००३ साली CVC ला वैधानिक दर्जा प्राप्त झाला होता.
- शिफारस समिती: कोणाचेही प्रशासकीय नियंत्रण नसणाऱ्या अशा स्वतंत्र स्वायत्त संस्थेची शिफारस के. संथनम समितीमार्फत करण्यात आली होती.