यंदाचा २०२६ सालचा 'राष्ट्रीय टपाल सप्ताह (National Postal Week)' हा ९ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत साजरा केला जात आहे.

ठळक मुद्दे:

  • हा सप्ताह संचार मंत्रालयांतर्गत येणाऱ्या टपाल विभागाद्वारे आयोजित केला जाणारा एक वार्षिक उपक्रम आहे.
  • टपाल सेवांच्या माध्यमातून भारताच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यात टपाल विभागाची भूमिका अधोरेखित करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.
  • २०२५ सालचा 'राष्ट्रीय टपाल सप्ताह' हा ६ ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान साजरा करण्यात आला होता.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • १८५४ मध्ये लॉर्ड डलहौसी यांनी भारतातील आधुनिक टपाल प्रणालीची सुरुवात केली होती
  • भारतीय टपाल कार्यालय कायदा, १८५४ द्वारे या प्रणालीसाठी कायदेशीर चौकट तयार करण्यात आली होती.
  • स्वातंत्र्यानंतर टपाल जाळ्याचा (नेटवर्कचा) विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यात आले.
  • १८७४ मध्ये 'युनिव्हर्सल पोस्टल युनियनची ( Universal Postal Union - UPU)' स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी 'जागतिक टपाल दिन' साजरा करण्यात येतो.