• उत्तराखंडमधील डेहराडून येथे 'शाश्वत पर्वत विकास शिखर परिषदेच्या (Sustainable Mountain Development Summit)' ९ व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • 'इंडियन माउंटन इनिशिएटिव्ह (Indian Mountain Initiative - IMI)' आणि 'सस्टेनेबल डेव्हलपमेंट फोरम उत्तरांचल (Sustainable Development Forum Uttaranchal - SDFU)' यांच्यामार्फत सदर शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

  • ‘कोविड - १९ नंतर पर्वतीय आर्थिक, अनुकूलन, नाविन्यता आणि प्रवेग बनविण्यासाठी उभरणारे मार्ग (Emerging Pathways for Building a Resilient Post COVID-19 Mountain Economy, Adaptation, Innovation and Acceleration)’ ही २०२० सालाची सदर दिवसाची थीम होती.

  • स्थलांतर, जलसुरक्षा, हवामान बदल, शेतीसाठी नाविन्यपूर्ण उपाय तसेच भारतीय हिमालयातील आपत्तीची जोखीम कमी करणे यांसारख्या विषयांवर सदर शिखर परिषदेत चर्चा करण्यात आली.