नुकतीच भारत आणि कझाकस्तानच्या सशस्त्र दलांच्या सहभागासह भारत-कझाकस्तान संयुक्त लष्करी सराव 'KAZIND' २०२६ ची ९ वी आवृत्ती कझाकस्तानमधील ओस्केमेन येथे सुरू झाली आहे.
ठळक मुद्दे:
- २८ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सदर सराव आयोजित केला जात आहे.
- यामध्ये सहभागी ६० सदस्यांच्या भारतीय तुकडीचे नेतृत्व प्रामुख्याने 'गढवाल रायफल्स' बटालियन करत आहे.
- या सरावामध्ये निम-शहरी तसेच डोंगराळ भागात संयुक्त दहशतवाद-विरोधी मोहिमांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.
- यामध्ये संयुक्त नियोजन, त्याची सखोल अंमलबजावणी, हवाई हालचाल तसेच मानवरहित हवाई प्रणाली क्षमतांचा एकात्मिक वापर यांवर विशेष भर दिला जात आहे.