नुकतीच नवी दिल्ली येथे ९ वी 'आसियान-भारत कृषी आणि वनक्षेत्रातील मंत्र्यांची बैठक (ASEAN–India Ministerial Meeting on Agriculture and Forestry)' संपन्न झाली आहे.
ठळक मुद्दे:
- ९ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथे ९ वी आसियान-भारत कृषी आणि वनक्षेत्रातील मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
- कृषी आणि वनक्षेत्रात 'आसियान' (Association of Southeast Asian Nations - ASEAN) आणि भारत यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करणे या मुख्य उद्देशासाठी ही बैठक महत्वपूर्ण ठरली आहे.
- भारताचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि आसियान अध्यक्षपदाचे प्रतिनिधित्व करणारे फिलीपिन्सच्या कृषी विभागाचे सचिव फ्रान्सिस्को पी. टियू लॉरेल यांनी या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले आहे.
बैठकीबाबत महत्वपूर्ण माहिती:
- अन्न-सुरक्षितता, शाश्वत तसेच लवचिक कृषी भविष्यासाठी आसियान-भारत सहकार्य इ. चा सदर बैठकीत पुनरुच्चार करण्यात आला.
- भारत आणि आसियान यांच्यातील वस्तूंचा द्विपक्षीय व्यापार आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १२८ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे.