दरवर्षी ९ सप्टेंबर रोजी 'जागतिक इलेक्ट्रिक वाहन [World Electric Vehicle (EV) Day] दिवस' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • ही एक जागतिक स्वरूपाची मोहीम आहे.
  • विद्युत गतिशीलता, शाश्वत परिवहन तसेच स्वच्छ ऊर्जा पर्यायांकडे होणारे सकारात्मक संक्रमण यांना सदर मोहीम प्रोत्साहन देण्याचे कार्य करते.
  • यंदाची २०२६ ची ही 'जागतिक EV दिवसाची' ७ वी आवृत्ती आहे.
  • २०२६ ची थीम/संकल्पना: 'इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय: वाहन चालवण्याचा खर्च कमी करणे (Switching Electric: driving down the cost of motoring)' ही यंदाच्या या दिवसाची थीम आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • २०२० मध्ये या दिवसाची सुरुवात झाली होती.
  • 'ग्रीन.टीव्ही (Green.TV)' ही युनायटेड किंगडमस्थित मीडिया कंपनी आणि 'असेआ ब्राउन बोवेरी (Asea Brown Boveri - ABB)' ही स्वित्झर्लंड-स्थित जागतिक तंत्रज्ञान कंपनी या दोहोंच्या भागीदारीमध्ये या दिवसाची सुरुवात झाली होती.
  • ९ सप्टेंबर २०२० रोजी या दिवसाची पहिली आवृत्ती साजरी करण्यात आली होती.