संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी ९ सप्टेंबर हा दिवस 'शिक्षणाचे हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day to Protect Education from Attack)' म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • संघर्षग्रस्त भागांमधील विद्यार्थी, शिक्षक, शाळा तसेच शैक्षणिक संस्थांच्या संरक्षणाची गरज याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
  • यंदाची २०२६ ची थीम/ संकल्पना: 'शिक्षण हल्ल्यातून तग धरू शकते का? मानवी समुदायांची लवचिकता (Can Education Survive Attack? The Resilience of Human Communities)' ही यंदाची या दिवसाची थीम आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • संयुक्त राष्ट्र आमसभेने स्वीकारलेल्या ठरावाद्वारे ९ सप्टेंबर हा दिवस 'शिक्षणाचे हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस' म्हणून निश्चित करण्यात आला होता.
  • कतारने हा ठराव मांडला होता आणि ६२ देशांनी त्याला सह-प्रायोजकत्व दिल्यानंतर त्याला मान्यत मिळाली होती.
  • पहिल्यांदा ९ सप्टेंबर २०२० रोजी हा दिवस साजरा करण्यात आला होता.
  • सदर वार्षिक उपक्रम 'युनेस्को (UNESCO) आणि 'युनिसेफ (UNICEF)' यांच्या सहकार्याने आयोजित केला जातो.

UNICEF बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): UNICEF म्हणजेच United Nations International Children's Emergency Fund अर्थात संयुक्त राष्ट्रे आंतरराष्ट्रीय बाल आपत्कालीन निधी होय.
  • स्थापना वर्ष:  ११ डिसेंबर १९४६ रोजी UNICEF ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण:  न्यू यॉर्क, अमेरिका येथे UNICEF चे मुख्यालय स्थित आहे.
  • संस्था कार्य व्याप्ती: जगातील जवळपास १९० पेक्षा जास्त देशांमध्ये संस्थेच्या कार्याचे जाले पसरले आहे.
  • सध्या कार्यरत कार्यकारी संचालक: कॅथरीन एम. रसेल हे सध्या UNICEF च्या कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत.
  • संस्था वैशिष्ट्य: १९६५ मध्ये युनिसेफला 'बालहक्क आणि जागतिक शांततेसाठी केलेल्या विशेष कार्याबद्दल नोबेल शांतता पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले होते.