भारतात दरवर्षी ९ सप्टेंबर रोजी 'हिमालय दिवस (Himalaya Diwas)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- हिमालय पर्वतरांगेचे महत्त्व अधोरेखित करणे तसेच तिच्या परिसंस्थेचे रक्षण करण्याची गरज यांबाबत जागरूकता निर्माण करणे या मुख्य उद्देशांसाठी भारतात दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
- यंदाची २०२६ ची 'हिमालय दिवसाची' १७ वी आवृत्ती साजरी करण्यात येत आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- सुप्रसिद्ध पर्यावरणवाद्यांनी पुढाकार घेऊन ज्यामध्ये सुंदरलाल बहुगुणा, अनिल प्रकाश जोशी तसेच राधा बहेन होते - हा दिवस साजरा करण्यास प्रयत्न केले होते.
- त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन उत्तराखंडमध्ये २०१० मध्ये सर्वप्रथम हिमालय दिवस साजरा करण्यात आला होता.
- २०१४ साली उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री. हरीश रावत यांच्यामार्फत ९ सप्टेंबर हा 'हिमालय दिवस' म्हणून साजरा करण्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले होते.
- ९ सप्टेंबर २०१५ रोजी पहिल्यांदा राज्याकडून अधिकृत मान्यता मिळाल्यानंतरचा पहिला हिमालय दिवस साजरा करण्यात आला होता.