संयुक्त राष्ट्रांमार्फत दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी जगभरात 'जागतिक टपाल दिन' (World Post Day) साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • 'युनिव्हर्सल पोस्टल युनियन'ची (Universal Postal Union - UPU) १८७४ मध्ये स्वित्झर्लंडमधील बर्न येथे स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रांमार्फत दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
  • २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'जागतिक टपाल दिन: एक टपाल नेटवर्क, अनंत शक्यता (World Post Day: One Postal Network, Infinite Possibilities)' ही या दिवसाची २०२६ सालची संकल्पना आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • १९६९ मध्ये जपानमधील टोकियो येथे झालेल्या 'युनिव्हर्सल पोस्टल युनियन'च्या अधिवेशनात संस्थेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून ९ ऑक्टोबर हा दिवस 'UPU दिन' म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.
  • १९८४ मध्ये जर्मनीतील हॅम्बर्ग येथे झालेल्या 'युनिव्हर्सल पोस्टल युनियन'च्या अधिवेशनात 'UPU दिन'चे अधिकृतपणे 'जागतिक टपाल दिन' असे नामकरण करण्यात आले होते.