दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी साजरा करण्यात येणारा 'जागतिक अंडी दिन (World Egg Day)' यंदा ९ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे:

  • अंड्यांचे पौष्टिक फायदे अधोरेखित करण्याच्या मुख्य उद्देशासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी हा दिवस साजरा केला जातो.
  • २०२५ मध्ये हा दिवस १० ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला होता.
  • २०२६ ची संकल्पना / थीम (Theme): 'प्रथिने: जी ऊर्जा देतात आणि संरक्षण करतात (Protein that Powers and Protects)' हे यंदाच्या या दिवसाची २०२६ सालाची संकल्पना आहे. 

दिवसाची पार्श्वभूमी:

  • 'जागतिक अंडी दिनाची' सुरुवात 'इंटरनॅशनल एग कमिशनद्वारे ( International Egg Commission - IEC)' जी आता 'वर्ल्ड एग ऑर्गनायझेशन (World Egg Organisation)' म्हणून ओळखली जाते तिच्यामार्फत करण्यात आली होती.
  • १९९६ मध्ये ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे झालेल्या परिषदेदरम्यान IEC ने ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार 'जागतिक अंडी दिन' म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले होते.
  • ११ ऑक्टोबर १९९६ रोजी 'पहिला जागतिक अंडी दिन' साजरा करण्यात आला होता.