दरवर्षी ९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन (National Legal Services Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- 'कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा (Legal Services Authorities Act)', १९८७ हा ९ नोव्हेंबर १९९५ रोजी लागू झाला होता.
- या घटनेच्या स्मरणार्थ तसेच विशेषतः समाजातील वंचित घटकांसाठी कायदेशीर जागरूकता निर्माण करण्याच्या तसेच न्यायापर्यंत समान पोहोच सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतात हा दिवस साजरा केला जातो.
- यंदा २०२६ ची या दिवसाची ३२ वी आवृत्ती साजरी करण्यात आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरणचे तत्कालीन कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती डॉ. ए. एस. आनंद यांनी १२ सप्टेंबर १९९८ रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित पहिल्या वार्षिक बैठकीत दरवर्षी 'राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन' साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
- पहिला 'राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन' ९ नोव्हेंबर १९९५ रोजी साजरा करण्यात आला होता.