दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राबवली जाणारी एक वार्षिक जागतिक मोहीम असणारा 'जागतिक गुणवत्ता सप्ताह (World Quality Week)' यंदा ९-१३ नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येत आहे.
ठळक मुद्दे:
- ही मोहीम 'चार्टर्ड क्वालिटी इन्स्टिट्यूटद्वारे (Chartered Quality Institute - CQI)' आयोजित केली जाते.
- मुख्यतः गुणवत्तेचा उत्सव साजरा करणे तसेच विविध संस्था, गट व समुदायांमध्ये गुणवत्तेचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे या मुख्य उद्देशांसाठी ही मोहीम राबवली जाते.
- २०२६ ची संकल्पना /थीम (Theme): 'गुणवत्ता: कार्यक्षमतेला चालना (Quality: Powering Performance)' ही यंदाच्या या सप्ताहाची संकल्पना आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- लंडन, युनायटेड किंगडम येथे मुख्यालय असलेल्या 'चार्टर्ड क्वालिटी इन्स्टिट्यूट (CQI) द्वारे पारंपारिकपणे 'जागतिक गुणवत्ता दिन' साजरा केला जात असे.
- पहिला 'जागतिक गुणवत्ता दिन' ९ नोव्हेंबर १९८९ रोजी साजरा करण्यात आला होता.
- २०२१ मध्ये CQI ने एका दिवसाच्या 'जागतिक गुणवत्ता दिना'चे रूपांतर एका आठवड्याच्या जागतिक मोहिमेत केले.