• वित्त मंत्रालयामार्फत जाहीर करण्यात आलेल्या 'व्यवसाय सुलभता सुधारणा (Ease of Doing Business Reforms)' पूर्ण करणारे केरळ हे देशातील ८ वे राज्य बनले आहे.

ठळक मुद्दे

  • आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडीशा, राजस्थान, तमिळनाडू आणि तेलंगणा या इतर ७ राज्यांच्या यादीमध्ये आता केरळ राज्य समाविष्ट झाले आहे.

केरळ राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्य दर्जा प्राप्त वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केरळला राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: तिरुवनंतपूरम ही केरळ राज्याची सध्याची राजधानी आहे.

  • राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान हे केरळच्या राज्यपाल पदावर आहेत.

  • मुख्यमंत्री: पिनाराई विजयन हे सध्या केरळच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.