नुकतीच भारत-म्यानमार नौदल सराव 'IMNEX-26' ची ८ वी आवृत्ती आंध्र प्रदेशात संपन्न झाली आहे.

ठळक मुद्दे:

  • भारत आणि म्यानमारच्या नौदलांनी द्विपक्षीय सागरी सहकार्य, कार्यात्मक समन्वय तसेच परस्पर कार्यक्षमता अधिक दृढ करणे या मुख्य उद्देशाने हा सराव संपन्न झाला आहे.
  • १० ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीदरम्यान आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे हा सराव आयोजित करण्यात आला होता.
  • म्यानमार नौदलाची युद्धनौका 'यूएमएस किंग सिन फ्यु शिन (UMS King Sin Phyu Shin)' आणि भारतीय नौदलाची युद्धनौका 'आयएनएस राणा (INS Rana)' यांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता.