'भारतीय वायुसेना दिन (Indian Air Force Day)' हा दरवर्षी ८ ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- हा दिवस 'IAF स्थापना दिन' म्हणूनही ओळखला जातो.
- यंदाचा २०२६ सालचा भारतीय वायुसेना दिनाचा ९४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे.
- २०२६ ची संकल्पना / थीम (Theme): 'भारतीय वायुसेना — अचूक, अभेद्य आणि नेमकी (Indian Air Force—Infallible, Impervious, and Precise)' हे यंदाच्या या दिवसाची संकल्पना आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- ८ ऑक्टोबर १९३२ रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना 'रॉयल इंडियन एअर फोर्स (Royal Indian Air Force)' या नावाने ब्रिटिश 'रॉयल एअर फोर्स'चा एक भाग म्हणून करण्यात आली होती.
- रॉयल इंडियन एअर फोर्सने १ एप्रिल १९३३ रोजी आपले पहिले अधिकृत उड्डाण केले होते.
IAF बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full-Form): IAF म्हणजेच Indian Air Force अर्थात भारतीय हवाई दल होय.
- स्थापना वर्ष: ८ ऑक्टोबर १९३२ रोजी IAF ची स्थापना करण्यात आली होती.
- बोधवाक्य (Motto): 'नभः स्पृशं दीप्तम्' (Touch the Sky with Glory) हे भारतीय हवाई दलाचे बोधवाक्य आहे.
- मुख्यालयाचे ठिकाण: IAF मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे.
- सर्वोच्च कमांडर: भारताचे राष्ट्रपती हे भारतीय हवाई दलाचे सर्वोच्च कमांडर असतात.
- सध्याचे वायुसेना प्रमुख: एअर मार्शल (Air Marshal) आशुतोष दीक्षित हे सध्याचे वायुसेना प्रमुख आहेत.
- वायुसेना दिन साजरा: ८ ऑक्टोबर रोजी वायुसेना दिन साजरा करण्यात येतो.