• तमिळनाडूच्या कट्टूपल्ली बंदरात भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast Guard - ICG) ७ व्या ऑफशोअर गस्त जहाज 'विग्रह (Vigraha)' चे नुकतेच औपचारिक अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • संरक्षण मंत्रालयामार्फत कंपनीसोबत करार करण्यात आलेल्या ७ ओपीव्ही मालिकेतील लार्सन आणि टुब्रो कंपनीने बनविलेले हे शेवटचे जहाज आहे.

  • खासगी क्षेत्रातील शिपयार्डने ऑफशोअर गस्त वर्गाची रचना व बांधकाम करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारतीय तटरक्षक दलाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९७८ साली भारतीय तटरक्षक दलाची स्थापना झाली होती.

  • महासंचालक: महासंचालक कृष्णस्वामी नटराजन हे सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: संरक्षण मंत्रालय, नवी दिल्ली हे मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • ब्रीदवाक्य: 'वयम् रक्षामः' हे दलाचे ब्रीदवाक्य आहे.