'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा (National Film Awards)' २०२६ च्या विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली असून हा सोहळा यंदा गुजरातमध्ये पार पडणार आहे.

ठळक मुद्दे:

  • यंदाचा २०२६ चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पहिल्यांदाच नेहमीच्या दिल्ली या ठिकाणाबाहेर आयोजित केले जाणार आहे.
  • आता तो गुजरात मधील 'एकता नगर' येथे हा संपन्न होणार आहे.
  • 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'जवळील एका तात्पुरत्या उभारण्यात येणाऱ्या ठिकाणी या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
  • सदर कार्यक्रमाला जवळपास १,००० लोकांची उपस्थिती (पुरस्कार विजेते, मान्यवर तसेच अधिकारी) अपेक्षित आहे.
  • केंद्र सरकारकडून हा सोहळा दिल्लीहून गुजरातला हलवण्याच्या स्थान बदलाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
  • या वर्षी निवडलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट याच स्मारकावर आधारित आहे ही या ठिकाणाचे वैशिष्ट्य अधोरेखित करणारी आणखी एक बाब आहे.
  • 'स्टॅच्यू ऑफ युनिटी – एकता का प्रतीक' या चित्रपटासाठी दिग्दर्शक आनंद एल. राय यांना 'नॉन-फीचर' श्रेणीतील सर्वोत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते २०२६

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता: ममूटी (चित्रपट: ब्रह्मायुगम) आणि कार्तिक आर्यन (चित्रपट: चंदू चॅम्पियन)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: यामी गौतम (चित्रपट: आर्टिकल ३७०)
  • सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक: रणदीप हुड्डा (चित्रपट: स्वातंत्र्यवीर सावरकर)
  • सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: आर्टिकल ३७०
  • सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म: भंगार
  • सर्वोत्कृष्ट माहितीपट: राम-नामी

इतर पुरस्कार विजेते चित्रपट (विविध श्रेणींमध्ये पुरस्कार):

  • कल्की २८९८ एडी
  • अमरन
  • पुष्पा: द रुल पार्ट-०२
  • स्त्री २