नुकताच ७० वा बॅलन डी'ओर (Ballon d’Or) पुरस्कार जाहीर करण्यात आले असून पुरुष गटात हॅरी केन तर महिला गटात ॲलेक्सिया पुटेलस यांनी हे पुरस्कार पटकावले आहेत.
ठळक मुद्दे:
- लंडन, युनायटेड किंगडम येथील पॅलेडियम थिएटरमध्ये 'बॅलन डी'ओर (Ballon d’Or)' पुरस्कार सोहळ्याची ७० वी आवृत्ती नुकतीच पार पडली आहे.
- २०२४ पासून हे पुरस्कार 'युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन' (Union of European Football Associations - UEFA) आणि 'फ्रान्स फुटबॉल'चे मालक फ्रेंच मीडिया ग्रुप 'ग्रुप अमाउरी (Groupe Amaury)' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहेत.
बॅलन डी'ओर पुरस्कार २०२६ चे प्रमुख विजेते:
बॅलन डी'ओर पुरस्कार (पुरुष गट):
- पुरुष गट बॅलन डी'ओर (गोल्डन बॉल अवॉर्ड) २०२६ - हॅरी केन (बायर्न म्युनिक आणि इंग्लंडचा स्ट्रायकर)
- पुरुष गट 'गर्ड मुलर ट्रॉफी' (स्ट्रायकर ऑफ द इयर) - हॅरी केन
बॅलन डी'ओर पुरस्कार (महिला गट):
- ॲलेक्सिया पुटेलस (स्पेन) - मिडफिल्डर (याआधी २०२१ आणि २०२२ मध्येही हा किताब प्राप्त)
कोपा ट्रॉफी (Kopa Trophy):
- पुरुष गट - लॅमिन यामल, बार्सिलोना एफसी आणि स्पेनचा विंगर
- महिला गट - विकी लोपेझ, बार्सिलोनाची मिडफिल्डर
सॉक्रेटिस पुरस्कार (Socrates Awards):
- 'सॉक्रेटिस पुरस्कार' - विंगर बुकायो साका, आर्सेनल
क्लब ऑफ द इयर (Club of the Year):
- पुरुष गट: पॅरिस सेंट-जर्मेन
- महिला गट: बार्सिलोना