-
'जागतिक कापूस दिन (World Cotton Day - WCD)' २०१९ सालापासून दरवर्षी ७ ऑक्टोबर रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
कापसाचे नैसर्गिक गुणधर्म, उत्पादन, परिवर्तन, व्यापार आणि खप यापासून लोकांना मिळणाऱ्या फायद्यांचे महत्व साजरे करण्याच्या उद्देशाने सदर दिवस साजरा करण्यात येतो.
-
ऑक्टोबर २०१९ मध्ये जागतिक व्यापार संघटनेमार्फत (World Trade Organization - WTO) सदर दिवसाची स्थापना करण्यात आली होती.
WTO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: WTO म्हणजेच World Trade Organization अर्थात जागतिक व्यापार संघटना होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे WTO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १ जानेवारी १९९५ रोजी WTO ची स्थापना झाली होती.
-
महासंचालक: रॉबर्टो अझेवेडो हे सध्या WTO च्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.
-
सदस्य देश: WTO चे १६४ सदस्य देश आहेत.