संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी ७ सप्टेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य दिन (International Day of Police Cooperation)' म्हणून साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- जागतिक सुरक्षा तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्य राखण्यात कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करणे या मुख्य उद्देशासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
- यंदाची २०२६ ची संकल्पना: 'असुरक्षिततेपासून संरक्षण — पोलीस कार्यात विश्वास आणि वैधता निर्माण करणे (Protecting against Vulnerability—Building Trust and Legitimacy in Policing)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- संयुक्त राष्ट्र आमसभेने १६ डिसेंबर २०२२ रोजी ठराव स्वीकारत ७ सप्टेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य दिन' म्हणून साजरा करण्याचे घोषित केले.
- ७ सप्टेंबर २०२३ रोजी हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.
- इंटरपोलची पूर्ववर्ती संस्था असलेल्या 'आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटनेची (International Criminal Police Organization - ICPC)' ७ सप्टेंबर १९२३ रोजी स्थापना झाली होती. तिच्या स्मरणार्थ ही तारीख निश्चित करण्यात आली होती.