संयुक्त राष्ट्रांद्वारे (United Nations - UN) दरवर्षी ७ सप्टेंबर रोजी 'निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day of Clean Air for Blue Skies)' पाळला जातो.
ठळक मुद्दे:
- जगभरातील पर्यावरणीय आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका असलेल्या वायू प्रदूषणाला कमी करण्याची तातडीची गरज अधोरेखित करणे तसेच जागतिक हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य बळकट करणे या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस पाळण्यात येतो.
- २०२६ ची थीम/ संकल्पना: 'हवामान कृतीसाठी स्वच्छ हवा (Clean Air for Climate Action)' ही यंदाच्या या दिवसाची थीम आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- १९ डिसेंबर २०१९ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मंजूर केलेल्या ठरावाद्वारे ७ सप्टेंबर हा दिवस 'निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस' म्हणून निश्चित करण्यात आला.
- ७ सप्टेंबर २०२० रोजी हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.
- ७ सप्टेंबर २०२६ रोजी भारतात पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 'निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस' हा राष्ट्रीय स्तरावर 'स्वच्छ वायू दिवस २०२६' म्हणून साजरा केला.
UN बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्र होय.
- स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी UN ची स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका येथे UN चे मुख्यालय स्थित आहे.
- सदस्य देश: सध्या UN चे १९३ सदस्य देश आणि व्हॅटिकन सिटी व पॅलेस्टाइन हे २ निरीक्षक देश आहेत.
- अधिकृत भाषा: UN मध्ये इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, चीनी, रशियन आणि अरबी या ६ अधिकृत भाषा आहेत.
- सध्या कार्यरत महासचिव (Secretary-General): सध्या अँटोनिओ गुटेरेस हे UN च्या महासचिव पदावर कार्यरत आहेत.