• ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांनी ३० जुलै २०२० रोजी ६ व्या ब्रिक्स पर्यावरण परिषदेमध्ये सहभाग घेतला. परिषदेचे अध्यक्षस्थान रशियाने भूषविले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे सर्व ऑनलाइन संपन्न झाले. ब्रिक्स कार्यकारी गटाच्या बैठकीपूर्वी ही बैठक झाली.

ठळक मुद्दे

  • ब्राझील संघराज्य, रशियन फेडरेशन, भारतीय प्रजासत्ताक, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना आणि दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक या देशांच्या पर्यावरण मंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित परिषदेत भाग घेतला.

  • केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांनी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले.

  • सदर बैठकीदरम्यान जावडेकर यांनी २०१९ मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (National Clean Air Programme - NCAP) यासारख्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.

  • २०२१ मधील पुढच्या बैठकीचे आयोजन भारत करेल.

'ब्रिक्स'विषयी महत्वपूर्ण माहिती

  • विशेषता: ब्रिक्स (BRICS) Brazil, Russia, India, China आणि South Africa या देशांची मिळून असणारी संघटना आहे. ब्रिक नावाने सुरुवातीला ४ देशांचे गटबंधन झाले होते. २०१० साली दक्षिण आफ्रिका सामील होऊन ब्रिक्स (BRICS) असे नाव प्रचलित झाले

  • स्थापना: २००९ साली ब्रिक्स (BRICS) ची स्थापना झाली होती 

  • संस्थेचे स्वरूप: आर्थिक, राजकीय आणि प्रादेशिक सहकारी संस्था या स्वरूपाने ही संस्था सध्या कार्यरत आहे

  • कार्यालयीन भाषा वापर: पोर्तुगीज, रशियन, हिंदी, चीनी आणि इंग्रजी या भाषांचा वापर करण्यात येतो