संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी साजरा करण्यात येणारा 'जागतिक अधिवास दिन (World Habitat Day)' यंदा ६ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे:

  • मानवी वस्त्यांची स्थिती अधोरेखित करणे तसेच प्रत्येक व्यक्तीला निवारा मिळण्याच्या अधिकाराला प्रोत्साहन देणे या मुख्य उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्र दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा दिवस साजरा करते.
  • २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'सर्वांसाठी पुरेसे गृहनिर्माण (Adequate Housing for All)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • १७ डिसेंबर १९८५ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेमार्फत ठराव स्वीकारला जाऊन ऑक्टोबर महिन्याचा पहिला सोमवार 'जागतिक अधिवास दिन' म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
  • सर्वप्रथम १९८६ मध्ये नैरोबी, केनिया येथे हा दिवस साजरा करण्यात आला होता.