'जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन (World Cerebral Palsy Day)' दरवर्षी ६ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • सेरेब्रल पाल्सीबद्दल (Cerebral Palsy) जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच अधिक समावेशक व सुलभ जगाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस दरवर्षी ६ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो.
  • २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'अद्वितीय आणि एकजूट (Unique and united)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • सेरेब्रल पाल्सी हा मज्जासंस्थेच्या विकारांचा एक समूह आहे. 
  • हा समूह हालचाल, शरीराची स्थिती तसेच स्नायूंच्या समन्वयावर परिणाम करतो तसेच सामान्यतः विकसनशील मेंदूला झालेल्या नुकसानीमुळे होतो.
  • सेरेब्रल पाल्सी अलायन्समार्फत २०१२ मध्ये ६ ऑक्टोबर हा जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले होते.