-
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नुकतेच ब्रिक्स (BRICS) उद्योग मंत्र्यांच्या ५ व्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले आहे.
ठळक मुद्दे
-
भारताकडे २०२१ साठीचे ब्रिक्सचे अध्यक्षपद आहे.
-
यंदा २०२१ साली भारतामार्फत 'इंट्रा ब्रिक्स कोऑपरेशन फॉर कंटिन्युटी, कॉन्सिलिडेशन अँड कन्सेन्सस (Intra BRICS Cooperation for Continuity, Consolidation and Consensus)' ही थीम निवडण्यात आली आहे.
ब्रिक्सबाबत (BRICS) महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: BRICS म्हणजेच Brazil, Russia, India, China, and South Africa अर्थात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका होय.
-
स्थापना वर्ष: २००९ साली BRICS ची स्थापना करण्यात आली होती.
-
सध्याचे नेते: जैर बोलसोनारो (ब्राझील), व्लादिमीर पुतीन (रशिया), नरेंद्र मोदी (भारत), शी जिनपिंग (चीन) आणि सिरिल रामाफोसा (दक्षिण आफ्रिका) हे BRICS चे सध्याचे नेते आहेत.