-
५ व्या 'भारत जल प्रभाव शिखर परिषदेचे (India Water Impact Summit - IWIS)' उद्घाटन केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री. रतनलाल कटारिया यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले आहे.
ठळक मुद्दे
-
सदरच्या ५ व्या IWIS जल परिषदेच्या माध्यमातून गुंतवणूकदार आणि भागधारकांमधील सुसंवाद अधिक मजबूत होऊन भारत आणि इतर देशांमधील जल व्यवस्थापनातील आंतरराष्ट्रीय सहकार्यास प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.
-
'स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियान (National Mission for Clean Ganga)' आणि 'गंगा नदी खोरे व्यवस्थापन व अभ्यास केंद्र (Center for Ganga River Basin Management and Studies - cGanga)' यांच्या वतीने सदर परिषद आयोजित करण्यात आली होती.
-
स्थानिक गंगा नदीपात्र आणि जलसाठे यांचे व्यापक विश्लेषण आणि एकंदरीत व्यवस्थापन ही या ५ व्या परिषदेची थीम आहे.