• ५ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चेरी ब्लॉसम महोत्सव (India International Cherry Blossom Festival) कोविड-१९ च्या साथीमुळे रद्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • मेघालयाची राजधानी शिलाँग येथे दरवर्षी हिमालयाच्या चेरी बहरांचा शरद ऋतूतील अद्वितीय पुष्प उत्सव साजरा करण्यासाठी सदर उत्सव आयोजित करण्यात येतो.

  • दरवर्षी शिलाँगमध्ये फिटनेस आर्ट, फॅशन शो, रॉक कॉन्सर्ट अशा बऱ्याच कार्यक्रमांसह या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

मेघालय राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: कॉनराड संगमा हे सध्या मेघालय राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: २१ जानेवारी १९७२ रोजी मेघालय राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: शिलॉंग ही मेघालय राज्याची राजधानी आहे.