• नागालँड २०२२ सालच्या 'दक्षिण आशियाई फेडरेशन क्रॉस कंट्री चॅम्पियनशिपचे (South Asian Federation Cross Country Championships)' तसेच ५६ व्या 'राष्ट्रीय क्रॉस कंट्री चॅम्पियनशिपचे (National Cross Country Championship)' आयोजन करणार आहे.

ठळक मुद्दे

  • नागालँडमार्फत आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा असेल.

नागालँड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: जगदीश मुखी हे सध्या नागालँडच्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यमंत्री: नेफिउ रिओ हे सध्या नागालँडच्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १ डिसेंबर १९६३ रोजी नागालँड राज्याची स्थापना करण्यात आली होती.

  • राजधानी शहर: कोहिमा हे नागालँडच्या राजधानीचे शहर आहे.