संपूर्ण भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय शिक्षक दिन (National Teachers’ Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • शिक्षकांचे समर्पण तसेच त्यांचे अमूल्य योगदान यांचा सन्मान करणे तसेच विद्यार्थी व समाजाला घडवण्यात त्यांची भूमिका अधोरेखित करणे या मुख्य उद्देशासाठी संपूर्ण भारतात दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
  • भारताचे पहिले उपराष्ट्रपती (१९५२-१९६२) आणि दुसरे राष्ट्रपती (१९६२-१९६७) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
  • राधाकृष्णन हे एक सुप्रसिद्ध विद्वान तसेच तत्त्ववेत्ता  होते.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • १९६२ मध्ये भारताचे दुसरे राष्ट्रपती बनल्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
  • याबाबत डॉ. राधाकृष्णन यांचे मत भिन्न होते. वाढदिवसाऐवजी ५ सप्टेंबर हा दिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करावा अशी सूचना त्यांनी केली.
  • ५ सप्टेंबर १९६२ रोजी पहिल्यांदा शिक्षक दिन साजरा करण्यात आला होता.
  • या निमित्ताने त्यांच्या जयंतीदिवशी समाजातील शिक्षकांच्या भूमिकेचा गौरव करण्यात आला.
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ५ सप्टेंबर २०२६ रोजी ४८ शालेय शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६' प्रदान केले.
  • अध्यापनातील उत्कृष्टतेसाठी उच्च शिक्षण संस्था आणि पॉलिटेक्निकमधील २१ प्राध्यापकांना 'शिक्षकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार (National Awards to Teachers - NAT)' देऊन सन्मानित करण्यात आले.