संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी मदर तेरेसा यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'आंतरराष्ट्रीय दानधर्म दिन (International Day of Charity)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- जागतिक सामाजिक आणि आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी दानधर्म आणि मानवतावादी प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर हा दिवस साजरा करण्यात येतो.
- थोर समाजसेविका मदर तेरेसा यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो.
दिवसाची पार्श्वभूमी:
- डिसेंबर २०१२ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ५ सप्टेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय दानधर्म दिन' म्हणून घोषित केला होता.
- जागतिक स्तरावर हा दिवस सर्वप्रथम ५ सप्टेंबर २०१३ रोजी साजरा करण्यात आला होता.
- या दिवसाच्या माध्यमातून गरिबी, असमानता तसेच मानवतावादी आव्हानांचा सामना करण्यासाठी जागतिक एकता आणि सामायिक जबाबदारी यांवर भर दिला जातो.
UN बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्र होय.
- स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी UN ची स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका येथे UN चे मुख्यालय स्थित आहे.
- सदस्य देश: सध्या UN चे १९३ सदस्य देश आणि व्हॅटिकन सिटी व पॅलेस्टाइन हे २ निरीक्षक देश आहेत.
- अधिकृत भाषा: UN मध्ये इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, चीनी, रशियन आणि अरबी या ६ अधिकृत भाषा आहेत.
- सध्या कार्यरत महासचिव (Secretary-General): सध्या अँटोनिओ गुटेरेस हे UN च्या महासचिव पदावर कार्यरत आहेत.