'युनेस्कोमार्फत (United Nations Educational, Scientific and Cultural Organization - UNESCO)' दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी 'जागतिक शिक्षक दिन (World Teacher’s Day)' साजरा केला जातो.

ठळक मुद्दे:

  • शिक्षकांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी, 'युनेस्को' दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा करते.
  • २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे: या व्यवसायाचे रक्षण, दर्जा उंचावणे आणि आपले भविष्य घडवणे यांची ६० वर्षे (Standing with teachers: 60 years of protecting the profession, advancing its status and shaping our futures)' ही यंदाच्या या दिवसाची थीम आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • ५ ऑक्टोबर १९६६ रोजी 'आंतरराष्ट्रीय कामगार संघटना' आणि 'युनेस्को' यांच्यामार्फत फ्रान्समधील पॅरिस येथे 'शिक्षकांच्या दर्जाबाबतची शिफारस' स्वीकारण्यात आली होती.
  • त्याच १९६६ च्या शिफारशीला २०२६ मध्ये ६० वर्षे पूर्ण झाली आहेत.
  • १९६६ च्या शिफारशीचा वर्धापन दिन म्हणून ५ ऑक्टोबर १९९४ रोजी पहिल्यांदा 'जागतिक शिक्षक दिन' साजरा करण्यात आला होता.

UNESCO बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना होय.
  • स्थापना वर्ष: १६ नोव्हेंबर १९४५ रोजी UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स येथे UNESCO चे मुख्यालय स्थित आहे.
  • सदस्य देश: सध्या UNESCO चे  १९४ सदस्य आणि १२ सहयोगी सदस्य देश आहेत.
  • सध्या कार्यरत महासंचालक: खालेद एल-एनी हे सध्या UNESCO च्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.