दरवर्षी ५ नोव्हेंबर रोजी 'जागतिक त्सुनामी जागरूकता दिन (World Tsunami Awareness Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- संयुक्त राष्ट्र, 'युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन' च्या माध्यमातून हा दिवस साजरा केला जातो.
- त्सुनामीसाठी पूर्वतयारीला प्रोत्साहन देणे, समुदायांची लवचिकता बळकट करणे तसेच त्सुनामीशी संबंधित धोके कमी करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
- यंदाची २०२६ सालची या दिवसाची ११ वी आवृत्ती साजरी करण्यात येत आहे.
- २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'त्सुनामीसाठी सज्ज राहा: लवचिकतेची सुरुवात तुमच्यापासून होते. (Be Tsunami Ready: Resilience Starts With You.)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- जपानच्या पुढाकाराने २२ डिसेंबर २०१५ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेमार्फत ठराव स्वीकारून ५ नोव्हेंबर हा दिवस 'जागतिक त्सुनामी जागरूकता दिन' म्हणून घोषित करण्यात आला होता.
- पहिला 'जागतिक त्सुनामी जागरूकता दिन' ५ नोव्हेंबर २०१६ रोजी साजरा करण्यात आला होता.