नुकतीच भारत-मलेशिया सागरी सराव 'समुद्र लक्ष्मण (Samudra Laksamana)'ची चौथी आवृत्ती मलेशियातील लुमुत येथे संपन्न झाली आहे.
ठळक मुद्दे:
- भारतीय नौदल (Indian Navy) आणि रॉयल मलेशियन नेव्ही (Royal Malaysian Navy) यांच्यातील द्विपक्षीय सागरी सराव 'समुद्र लक्ष्मण' सरावाची चौथी आवृत्ती मलेशियातील लुमुत येथे पार पडली आहे.
- दोन्ही देशांच्या नौदलांमधील सागरी सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमता बळकट करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता.
'समुद्र लक्ष्मण २०२६' सरावाबाबत महत्वाची माहिती:
- 'केडी लेकिर (KD Lekir)' आणि 'केडी गगाह साम (KD Gagah Sam)' या जहाजांनी रॉयल मलेशियन नेव्हीसाठी या सरावात प्रतिनिधित्व केले.
- व्यावसायिक ज्ञानाची देवाणघेवाण वाढवणे तसेच दोन्ही नौदलांमधील समन्वय आणि कार्यात्मक सुसूत्रता सुधारणे हा भारताच्या 'कार्यात्मक तैनातीअंतर्गत (Operational deployment)' आयोजित या सरावाचा मुख्य उद्देश होता.
- सदर सरावामध्ये 'बंदरातील टप्पा (Harbour Phase)' आणि त्यानंतर 'समुद्रातील टप्पा (Sea Phase)' अशा टप्प्यांचा समावेश करण्यात आला होता.
- 'बंदरातील टप्पा (Harbour Phase)' यामध्ये जहाजांना भेटी, विषय तज्ज्ञांची देवाणघेवाण आणि क्रीडाविषयक उपक्रम यांचा समावेश होता.
- तर 'समुद्रातील टप्पा (Sea Phase)' यामध्ये कार्यात्मक देवाणघेवाण, सागरी सहयोग उपक्रम तसेच संयुक्त प्रशिक्षण यांचा समावेश करण्यात आला होता.