• सार्क फायनान्स गव्हर्नर्स (SAARCFINANCE Governors’) गटाची ४० वी बैठक भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे (Reserve Bank of India - RBI) गव्हर्नर श्री. शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली व्हर्च्युअली पार पडली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर बैठकीला सार्क मध्यवर्ती बँकांमधील गव्हर्नर्सनी आपली उपस्थिती दर्शवली.

  • सदर बैठकीदरम्यान श्री. दास यांनी बंद करण्यात आलेले सार्क फायनान्स सिंकचे (SAARCFINANCE Sync), जे समूह सुरक्षित संप्रेषण नेटवर्क आहे त्याचे उद्घाटन देखील केले.

सार्क फायनान्सबाबत (SAARCFINANCE) महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: ९ सप्टेंबर १९९८ रोजी SAARCFINANCE ची स्थापना करण्यात आली होती.

  • सध्याचे अध्यक्ष: भारतीय रिझर्व्ह बॅंक (RBI) ही सध्याची अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.

  • समाविष्ट मध्यवर्ती बँका: सेंट्रल बँक ऑफ श्रीलंका (Central Bank of Sri Lanka), दा अफगाणिस्तान बँक (Da Afghanistan Bank), बांगलादेश बँक (Bangladesh Bank), भारतीय रिझर्व्ह बॅंक (Reserve Bank of India), भूतान रॉयल मॉनेटरी अथॉरिटी (Royal Monetary Authority of Bhutan), स्टेट बँक ऑफ पाकिस्तान (State Bank of Pakistan), मालदीव मॉनिटरी अथॉरिटी (Maldives Monetary Authority) आणि नेपाळ राष्ट्र बँक (Nepal Rastra Bank) या मध्यवर्ती बँका समाविष्ट आहेत.