संयुक्त राष्ट्रांद्वारे दरवर्षी ४ ते १० ऑक्टोबर या कालावधीत 'जागतिक अंतराळ सप्ताह (World Space Week)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- मानवी जीवनात अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका अधोरेखित करणे तसेच त्यातील उपक्रमांबाबत जागरूकता निर्माण करे या मुख्य उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे दरवर्षी ४ ते १० ऑक्टोबर या कालावधीत 'जागतिक अंतराळ सप्ताह' साजरा केला जातो.
- २०२६ ची संकल्पना /थीम (Theme): 'रॉकेट क्रांती (Rocket Revolution)' हे यंदाच्या या सप्ताहाची संकल्पना आहे.
- अंतराळ प्रक्षेपणांमध्ये होणारे बदल तसेच त्यामुळे अंतराळापर्यंतची वाढलेली सुलभता यांवर यात लक्ष केंद्रित करणे या मुख्य उद्देशासाठी हा सप्ताह साजरा करण्यात येतो.
दिवसाची पार्श्वभूमी:
- १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमार्फत ठराव मंजूर करण्यात येऊन ४ ते १० ऑक्टोबर हा कालावधी अधिकृतपणे 'जागतिक अंतराळ सप्ताह' म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले.
- पहिला जागतिक अंतराळ सप्ताह ४ ते १० ऑक्टोबर २००० या कालावधीत साजरा करण्यात आला होता.